सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

44

जितेंद्र तेल्हरा
 तेल्हारा तालुका, प्रतिनिधि
 तेल्हरा: हिवरखेड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी सर  व प्रमुख अतिथीं म्हणून  उपस्थित होत्या.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनानंतर वर्ग 5 वी च्या विद्यार्थिनींनी “जिजाऊ वंदना” सादर केली. वर्ग  6 वी च्या विद्यार्थिनींनी “आम्ही जिजाऊच्या लेकी”गीत सादर केले. त्यानंतर राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेले सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक स्थळांची संपूर्ण माहिती  विद्यार्थ्यांना देण्यात आली. सेजल अढlऊ या  विद्यार्थिनीने “मी जिजाऊ बोलते “हा एक पात्री प्रयोग सादर केला. श्रेया पोके या 9 वी च्या विद्यार्थिनीने सुद्धा जिजाऊ च्या भूमिकेमध्ये आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रकाश टाकला. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या बोळे मॅडमनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत तिवारी सर यांनी आपल्या  अध्यक्षशीय  भाषणांमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्या काळामध्ये केलेले संघर्ष व त्या काळामध्ये राष्ट्रासाठी त्यांचा असलेले योगदान या विषयावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थिनी सृष्टी बांगर व दिव्या भोपळे यांनी केले. या कार्यक्रमा चे आयोजन रेड हाऊस तर्फे करण्यात आलेले होते या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.