मुलचेरात विहिप तर्फे मकरसंक्रात उत्सव संपन्न

44

मुलचेरा :- विश्व हिंदू परिषद अहेरी जिल्हा, प्रखंड मुलचेरा च्या वतीने मुलचेरा येथे सामाजिक समरसता अभियाना अंतर्गत मकरसंक्रांत उत्सव संपन्न करण्यात आले. या कार्यक्रमाला विभागीय संयोजक बजरंग दल विनय मडावी यांनी सामाजिक समरसता विषयावर उद्बोधन केले. उद्बोधनात सामाजिक समरसता म्हणजे काय? महत्व व गरज सविस्तर सांगण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष सीताराम सोनानिया, जिल्हा मंत्री अमित बेझलवार, उपाध्यक्ष गोरंग शिल, सह जिल्हामंत्री सुधाकरजी मद्येर्लावार, प्रखंड मंत्री सदाशिव माकडे, ममता हलदार उपाध्यक्षा, रंजिता सरकार मातृशक्ती, क्रीषना घरोजा दुर्गवाहिनी, पोर्णिमा घरोजा संयोजिका, सरजू हलदार संयोजिका, ज्योती सोनूले,प्रितिका दास सहसयोजिका, विशाखा दत्ता व गावातली बहुसंख्य महिला उपस्थीत होते.