मूलचेरा:-
तालुक्यातील चुटूगुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एल सी प्लेयर क्रीडा मंडळ लगाम चेक द्वारा भव्य खुले टेनिस बॉल 30 यार्ड ग्रामीण क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी बोलताना ते म्हणाले मी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक युवा वर्गाला कित्येक वर्षांपासून कब्बडी, क्रिकेट, हॉलीबॉल, असे सामने आयोजित करण्यासाठी सहकार्य करत असतो, आपल्या क्षेत्रातील युवा हा खेळाच्या माध्यमातून आपली प्रगती करू शकला पाहिजे आणि आपलं भविष्य बनवू शकला पाहिजे, क्रीडा क्षेत्रात आपलं नाव कमवू शकला पाहिजे,आपल्या क्षेत्रातील युवा समोर जाईल,तेव्हा आपला गडचिरोली जिल्हा समोर जाईल, आपला देश समोर जाईल, कारण आपला देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो,आजचा युवक हा उद्याचा देशाचा भविष्य आहे असे मत यावेळी त्यांनी दिले,
त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम (महाराज) माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य,तथा माजी पालकमंत्री जिल्हा गडचिरोली, कार्यक्रमाचे सह उद्घाटक सौ. माधुरी ताई उरेते माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद गडचिरोली , कार्यक्रमाचे अध्यक्ष कु.साधनाताई मडावी सरपंच ग्रामपंचायत चुटुगूंटा , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. हनुमंत आत्राम, माजी सरपंच,सौ. प्रेमीला पेंदंम पोलीस पाटील ,सौ.सिडाम मॅडम अंगणवाडी पर्यवेक्षिका, श्री.खेवले सर मुख्याध्यापक रा.ध.हायस्कुल लगाम, श्री. वैष्णव ठाकुर सामाजिक कार्यकर्ते, श्री.विकास सडमेक , श्री.नारायण पेंदाम , श्री.मनोज आचारी तसेच राजे धर्मराव हायस्कुल चे सर्व कर्मचारी,गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.