अरमोरी तालुका भुमिअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात आरमोरी नगरपरिषद घरकुल लाभार्थ्यांची भुमिअभिलेक कार्यालयावर धडक
आरमोरी – नगरपरिषद हद्दीत गौरगरीब अल्प भुधारक लाभार्थ्यांना राहण्यासाठी चांगला निवारा मिळावा या हेतूने केंद्र सरकारने प्रधानमंत्री शहरी आवास योजना सुरू करुन आरमोरी नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री शहरी आवास घरकुल योजना मंजूर करण्यात आली.परंतु यासाठी आखिव प्रत्रीकेवर लाभार्थ्यांचे नाव असने गरजेचे आहे.पण जागा हद्दवाढ झाली परंतु आखिव प्रत्रीकेवर सरकार मालक नावाने असल्यामुळे घरकुलाचा लाभ घेता येत नसल्यामुळे लाभार्थी वारंवार भूमि अभिलेख कार्यालयाच्या चकरा मारत असताना आज काही आरमोरी नगरपरिषदेतील लाभार्थी आरमोरी येथील भुमिअभिलेख कार्यालयाला कामासाठी गेले असता वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे लाभार्थ्यांनी तालुका काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात धाव घेतली असता, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे आणि गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी समस्या जाणून आरमोरी येथील भूमी अभिलेख कार्यालयावर लाभार्थ्यासह धडक दिली.परंतु त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नसल्याने संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मंजूर झालेला घरकुलाचा निधी वापस जाऊन रामाळा,पालोरा, बाजार तोली,काळा गोटा, इंदिरानगर डोंगरी इंदिरानगर बर्डी येथील लाभार्थ्यांना निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ आली
पहिले नगरपरिषद मध्ये पालोरा गाव समाविष्ट होण्यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर शेकडो घरकुल मंजूर झाली होती. परंतु नगरपरिषद मध्ये समाविष्ट होताच मात्र त्यांची स्वप्न भंग पावले चार वर्षे लोटूनही नगरपरिषदे कडून नावाची आखीव पत्रिका नाही म्हणून अद्यापही एकाही लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. सर्वे होऊन हद्दवाढ झाली असली तरी मात्र अखीव पत्रिका हे अद्यापही सरकारच्या नावाने आहे. परंतु नव्याने घर मालकाच्या नावाच्या पत्रिका बनवल्या नसल्यामुळे संपूर्ण माहिती विचारण्यासाठी गेले असता भुमिअभिलेख कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी नसल्याने रोष व्यक्त केला. यांची माहिती तहसीलदार कल्याकुमार दहाट यांना देताच,बाहेर गेलेले कर्मचारी कार्यालयात उपस्थित झाले. या संबंधी विचारणा केली असता गोंदियाला भुमिअभिलेख कार्यालयाचे खेळ आहेत.प्रॅक्टिस साठी गेलो होतो असे सांगितले.
यावर जर आरमोरी नगरपरिषद हद्दीत गौरगरीब अल्प भुधारक लाभार्थ्यांच्या आखिव प्रत्रीका काहि दिवसांत नावाने मिळाल्या नाही, तर आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेव मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम, अनिल किरमे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दिवाकर पोटफोडे, मोरेश्वर धारणे ,हरीदास हजारे, टिकाराम दुमाने, विठ्ठल हजारे, गजानन डोंगरे , प्रभाकर मेत्राम, यासह मोठ्या प्रमाणात आखिव प्रत्रीका लाभार्थी उपस्थित होते.