एटापल्ली..एटापल्ली तालुक्यातील शेवटचं टोकं असलेल्या नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील गुंडम या गावातील ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी गुंडम या गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
गुंडम या गावातील ग्रामस्थांनी यापूर्वी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची भेट घेऊन एकदा गावाला भेट देण्याचे विनंती केले होते.ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत गुंडम या गावाला भेट देऊन तेथील समस्या बारकाईने समजून घेतले. यावेळी येथील ग्रामस्थांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मार्गदर्शन करतांना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी येथील ग्रामस्थांची व गावातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्यासमवेत माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, जुलेख शेख,कसनसुर ग्राम पंचायत चे सरपंच कमलताई हेळो, वोघेझरीचे सरपंच विलास कोंदामी ,शिडाम काका,बंडूभाऊ इष्टम,निकोळे काका,माजी सरपंच सुनील मडावी,बारसु उसेंडी,गाव भूमिया आतला काका,कावळे,मोहूर्ले,इष्टाम, निलकंठ निकोडे,राकेश बोलमपल्लीवर आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधींनी गुंडम या गावाला भेट देऊन त्यांची समस्या समजून घेतले नाही.गुंडम या गावाला भेट देणारे माजी आमदार दिपक दादा आत्राम हे बहुतेक पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत. माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी पहिल्यांदाच अतिसंवेदनशील गुंडम या गावाला भेट देऊन तेथील ग्रामस्थांची समस्या जाणून घेत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी माजी आमदारांप्रति समाधान व्यक्त केले.