#Ajaykankdawarमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सिरोंचा येथे वली हैदर बाबा उर्स उत्साहाला भेट देऊन दर्शन घेतले.

42

सिरोंचा – गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा टोकावार असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षी प्रमाणे हा वर्षी सुधा हजरत वली हैदर शाह बाबा उर्स व कव्वाली कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन वली हैदर शाह बाबाचे कार्यकर्त्यांसमेवत दर्शन घेतले.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार
 हात पुढे करत उर्स कार्यक्रमाला ₹31000 हजार रूपये रोख रक्कम मदत करण्यात आली.यावेळी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे असे वली हैदर शाह बाबाकडे प्रार्थना केले.
यावेळी उपस्थित सिरोंचा नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलूभैया पाशा, नगरसेवक इम्तियाजभैया खान,नगरसेवक मारुतीभाऊ गणपूरवार,ग्राम संवाद सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य अहेरी नि. क्षेत्र अध्यक्ष किरणभाऊ वेमूला,रवीभाऊ बोगोणी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांतभाऊ गोडसेलवार, नागेश दुग्गयाला,
 नागराजू इंगली,माजी जि.प.अध्यक्ष यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपतभाऊ गोगूला,नरेशभाऊ गर्गम,जनगम सडवली, प्रकाश दुर्गे,सुरेशभाऊ पेगडापेल्ली,राकेश सडमेकसह आविसंचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.