अशोक आईंचवार
शहर प्रतिनिधी अहेरी
अहेरी :- आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा, केंद्र-राजाराम येथे स्वच्छतेचे महान पुजारी संत गाडगेबाबांची यांची १४७ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरजलाल येलमुले प्राथमिक शिक्षक यांनी गाडगेबाबा यांची वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांचे सहकार्याने ग्रामस्वच्छता करून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर शाळेतील पटांगणात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वच्छतेचे महान पुजारी संत गाडगेबाबा यांच्या जिवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना शिक्षण व स्वच्छता याविषयी किर्तनाचे माध्यमातून सुरजलाल येलमुले प्राथमिक शिक्षक यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरील महात्मे व पैलू समजावून सांगितली. साकारलेल्या भूमिकेचे विद्यार्थीनी खुप कौतुक केले व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्पना रागिवार मुख्याध्यापिका ह्या होत्या.तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ.पल्लवी ईटनकर, किर्ती गेडाम प्राथमिक आरोग्य केंद्र, छल्लेवाडा उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व स्वच्छता आरोग्य याविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुसली जुमडे,बाबुराव कोडापे, निलिमा पातावार ,फुलसिंग जाधव,अनंता सिडाम प्राथमिक शिक्षक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गुरनुले या विद्यार्थ्यांने केले तर सर्वांचे आभार किर्ती वाडगुरे या विद्यार्थ्यीने मानले.