# BJPताडगाव येथे गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे उदघाटन

57

नवयुवक क्रीडा मंडळ, ताजूडगाव द्वारा आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे दानू वंजा आत्राम ताडगाव यांच्या भव्य पटांगणावर आयोजित केले.या स्पर्धेचा उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 
यावेळी उदघाटनिय भाषणात ते म्हणाले युवक देशाचे आधारस्तंभ आहेत युवकांनी सामाजिक, शैक्षणिक क्रीडासह प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात अग्रणी राहून विकास व प्रगतीचा धुरा सांभाळल्यास निश्चितच तालुका,जिल्ह्याचं, राज्याचा नाव कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. युवकच देशाचे आधारस्तंभ असून युवकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा.सौ.रामबाई कोमटी महाका नगराध्यक्ष, नगरपंचायत भामरागड, मा.सौ.संगीताताई गाडगे माजी नगराध्यक्ष, भामरागड,मा.रेका कोपाजी आत्राम गावपाटील,ताडगाव, सौ.कल्पनाताई तपन बिश्वास भाजपा महिला आघाडी अध्यक्षा, भामरागड, जोगी आत्राम, कोरके दामा आत्राम,देवू कुडयामी,प्रदीप मडावी,सगू रामा आत्राम,विनोद पडालवार, बाबुराव आत्राम, विनोद आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते