टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांचे आदिवासी संस्कृती ने भव्य स्वागत करण्यात आले

59

टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे सदस्य मेळावा आयोजित करण्यात आले व टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांचे आदिवासी संस्कृती ने भव्य स्वागत करण्यात आले 
तसेच हजारो युवक-युवती कार्यक्रमात सहभागी
२० फेब्रुवारी टायगर ग्रुप ऑल इंडिया ही एक देशातील सर्वात मोठी युवकांची सामाजिक संघटना आहे. त्या संघटनेचे संस्थापक वस्ताद जालिंदर भाऊ जाधव आणि टायगर ग्रुप अध्यक्ष डॉ. पै. तानाजी भाऊ जाधव आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण भारत देशात
 रोड अपघात प्रसंगी मदत, गोर गरीबांना अन्नदान, कपडे वाटप, शालेय वस्तू वाटप, कोणत्या कार्यक्रम निमित्त गो शाळेत चारा वाटप, रक्तदान शिबिर, तसेच शासकीय दवाखानामध्ये मोफत रक्त पुरवठा, मुलीच्या रक्षणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उभे राहणे असे अनेक काम ही संघटना करते. तानाजी भाऊ यांचे देश भरातील सामाजिक काम आणि युवकांना व्यसनापासून दूर ठेवून समाजसेवेची लावलेली ओढ व शांतता पूर्वक पद्धतीने केले जाणारे समजिक कार्याची दखल घेत डॉ. नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
याच प्रकारे नक्षग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ७ वर्षापासून डॉ.तानाजी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मोफत रुग्णवाहिका सेवा, रक्तपरवठा, कत्तल खाण्यात जाणाऱ्या गायींना जीवनदान दिले अशे अनेक कामे टायगर ग्रुपच्या माध्यमातून केली आहे . हे सगळे काम पाहून संघटनेचे अध्यक्ष  डॉ.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य सदस्य मेळावा आलापल्ली येथे आयोजित करण्यात आले होते
  २० फेब्रुवारी आलापल्ली वीर बाबुराव सेडमाके चौक ते टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालय आलापल्ली भव्य आदिवासी सांप्रदाय ने स्वागत रॅली काढण्यात आले  व  क्रीडा संकुल ग्राउंड आलापल्ली येथे टायगर ग्रुप सदस्य मेळावा कार्यक्रम  आयोजित करण्यात आले कार्यक्रम दरम्यान युवकांचा सत्कार करण्यात आले यात हजारोंच्या संख्येने टायगर ग्रुप चे सदस्य सहभागी झाले.
गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम युवकांना सामाजिक कार्या विषयी मार्गदर्शन केले तसेच सामाजिक कार्याचे कौतुक केले. टायगर ग्रुप आलापल्ली च्या सदस्यांना कसल्याही प्रकारची मदत लागली तर मी नेहमी त्यांचा पाठीशी आहे असे बोलले .
सदर कार्यक्रमात टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.तानाजी भाऊ जाधव , गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम, टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर, टायगर ग्रुप नांदेड अध्यक्ष बाळू भाऊ जाधव ,
 सहील दादा काजी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीरामजी मडावी,वाळके साहेब,सुष्मेश भय्या प्रधान, ईश्वर भाय्या साने, चंदू भाऊ वैद्य , आलापल्ली सरपंच शंकरजी मेश्राम,ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर भाऊ रामटेके,मनोज भाऊ बोलुवार ,मंगेश भाऊ नरसापुरे, जुगल सर बोंमनवार,स्वरूप सर गावडे , टायगर्स क्रिकेट क्लब अध्यक्ष चंद्रकांत भाऊ सडमेक,रवी भाऊ नेलकुद्री,विकास भाऊ उईके आदी उपस्थित होते .