#Sironca#हवामान अनुकूल पिके म्हणून मिलेट्स ची लागवड शेतकऱ्यांनी करावी – श्री अंकित उपविभागीय अधिकारी यांचे आवाहन

51

सिरोंचा:आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे औचित्य साधून आज दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिरोंचा च्या  वतीने तालुकास्तरीय पौष्टिक  तृणधान्य कार्यशाळा   आयोजित करण्यात आली सुरु.  या कार्यशाळेत महसूल विभाग, पंचायत समिती अंतर्गत सर्व विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, चे अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील शेतकरी,  शेतकरी कृषी मित्र, शेतकरी गट, यांनी सहभाग नोंदवला कार्यशाळेला विशेष उपस्थिती मा. अंकित गोयल साहेब उपविभागीय अधिकारी अहेरी यांची लाभली तर उदघाटक म्हणून मा. जितेंद्र शिकतोडे साहेब तहसीलदार सिरोंचा, अध्येक्ष स्थानी मा. आनंद गंजेवार उपविभागीय कृषी अधिकारी अहेरी, प्रमुख पाहुणे मा. अनिल पटले  प्रभारि गट विकास अधिकारी सिरोंचा, मा. सय्यद साहेब नायब तहसीलदार सिरोंचा, मा. शेंडे साहेब गट शिक्षणाधिकारी सिरोंचा, मा. विनोदकुमार पांचाळ साहेब कृषी अधिकारी सिरोंचा, मा. मनोहर कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी हे उपस्थित होते.

बदलत्या जीवनशैली मुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व वाढलेले आजार यावर पौष्टिक तृनंधान्य चे दैनंदिन आहारातील महत्व्  त्यामध्ये  ज्वारी, बाजरी, नागली, कोडो, कुटकी, भगर, इत्यादी तृणधान्याचे आहारातील महत्त्व तसेच
ही पिके क्लायमेट रिसायलेंट आहेत आणि यांना कमी पाणी व व्यापक वातावरणात येतात तसेच प्रतिकूल हवामानामध्ये सुद्धा उत्पादक देऊन जातात तसेच याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे साखर नियंत्रित ठेवल्याने व मेद नियंत्रित ठेवल्याने अनेक जीवनशैलीविषयक आजार केवळ आहारातील बदलाने टाळता येऊ शकतात असे माननीय श्री अंकित सर यांनी नमूद केले श्री अंकित यांनी सांगितले तर विविध या विभागांचा सहभाग नोंदवण्याची अपील तहसीलदार यांनी व्यक्त केली. दैनंदिन आहारातील बदल परिणामी शरीरावर होणारे जीवनशैली निगडित आजार आटोक्यात आणण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश याबाबत प्रेसेंटेशन च्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन श्री गंजेवार यांनी केलेतृनंधान्याची बाजारातील वाढती मागणी लक्षात घेता सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून उत्पादिक मालाचे ब्रॅण्डिंग करून मार्केटिंग केले तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व याकरिता स्मार्ट योजनेतून 60 टक्क्यापर्यंत अनुदान सुद्धा उपलब्ध असल्याचे सांगून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी तृनंधान्याची लागवड करावी व त्याचा आपल्या आहारात समावेश करावा असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी श्री दोंदे यांनी केले……..तसेच आशा वर्कर्स यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.. *कोडो कुट्टी राळा मधुमेह टाळा.. मिलेट डाएट इज राईट* अशा घोषणा याप्रसंगी देण्यात आला वेगवेगळ्या प्रकारच्या तृणधान्याच्या रेसिपी बनवून कसे आहारात तृणधान्य समाविष्ट करणे याबाबत तालुका कृषी अधिकारी जगदीश दोंदे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर एन मेश्राम व श्रीमती  रंजना बोबडे  यांनी केले तर श्री ओ वांय लांजेवार यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला….प्रसंगी कृषि विभगाचे कर्मचारी श्री नैताम श्री पेंदाम श्री भोयर श्री पुळो उपस्थित होते  ..कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी विभागच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.