गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपा अहेरी तालुका कार्यकारिणीची बैठक आलापल्ली येथे पार पडली.
पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने युवकांचा सहभाग वाढविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पक्ष संघटनेचा विस्तार, मजबुतीकरण, आगामी विधानसभा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका यासह विविध संघटनात्मक विषयांवर मंथन करण्यात आले. गरीब कल्याण हाच आमचा संकल्प असून केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळगाळात सर्व स्तरापर्यंत व आवश्यक घटकांपर्यंत पोहचवा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.