#BJP#भाजपची आलापल्ली येथे तालुका कार्यकारिणी बैठक खा अशोक नेते यांच्या उपस्तिथीत संपन्न

60

दिं. २५ फेब्रुवारी २०२३
आलापल्ली:-भारतीय जनता पार्टी तालुका अहेरी कार्यकारिणीच्या या महत्वाच्या बैठकी निमित्ताने खासदार अशोकजी नेते यांनी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शक करतांना भारतीय जनता पार्टी चे संघटनात्मक धोरण मजबुत करण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एक मताने एकजुटीने कार्य केले पाहिजे. यासाठी डेटा एन्ट्री,नमो ॲप तसेच
 ७०३०७७६१६१ या नंबर वरून  फ्रेंड्स ऑफ बीजेपी व सरल ॲप च्या माध्यमातून संघटन व संघटना मजबूत करणे महत्वाचे आहे.डाटा व्यवस्थापन एन्ट्री च्या माध्यमातून ऑनलाईन  सेवेने केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना  थेट तळागाळापर्यंतच्या  लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केले जाते.असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी या कार्यकारिणी बैठकी प्रसंगी केले.
  
पुढे बोलतांना केंद्र सरकारच्या विविध योजनेचा ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला अशा लोकांनी,जनतेनी पंतप्रधानांना धन्यवाद! मोदी जी असा पोस्ट कार्ड विविध योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांनी लिहून द्यावे.असे आव्हान  खासदार अशोकजी नेते यांनी अहेरी कार्यकारिणीच्या बैठकी प्रसंगी केले.
या बैठकीला  प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टि मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्रजी ओल्लावार यांनी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.तर संचालन जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, यांनी केले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टि मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र
 ओल्लालवार,आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदिप कोरेत,तालुकाध्यक्ष रवि नेलकुद्री,जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार,जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चाचे सागर डेकाटे,सोशल मिडियाचे प्रमुख आनंद खजांजी,शहर सचिव विनोद ठाकरे,आदर्श केशनवार,अभिजीत शेंडे तसेच अनेक  भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.