घोट वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, घोट च्या वतीने वन्यजीव सप्ताह निमित्त मोटरसायकल रॅली आयोजना करून शेवट करण्यात आले.

208

*अनिल कांदो तालुका* प्रतिनिधी चामोर्शी
मो.नं.९८३४४७५६८०
दिनांक -०७/१०/२०२५

चामोर्शी – तालुक्यातील आलापल्ली वनविभागातील घोट वनपरिक्षेत्राच्या वतीने वन्यजीव सप्ताह विविध कार्यक्रम आयोजित केले होते आज सप्ताहाच्या निमित्ताने मोटरसायकल रॅली काढण्यात आली.सदर रॅली द्वारे वन्यजीव बॅनरच्या माध्यमातून वन व वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन करण्याचे संदेश देण्यात आले. तसेच मकेपल्ली पर्यंत रॅली काढण्यात आली आणि साईनाथ विद्यालय, मकेपल्ली येथे उपस्थित विद्यार्थांना वन व वन्यजीव संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे यांचे महत्त्व पटवून मोटरसायकल रॅली द्वारे शेवट करण्यात आले.