भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयात अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट वर कार्यशाळा संपन्न

244

*एटापल्ली* :- भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे अकॅडेमीक बँक ऑफ क्रेडिट वर कार्यशाळा 27 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाँ.एस.एन. बुटे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. रंजीत मंडल अकॅडेमिक समिती सदस्य, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सचिन शेंडे, सहयोगी प्राध्यापक, नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्प मालार्पण आणि दीप प्रज्वलन करून अभिवादन केले.

यावेळी प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. रंजीत मंडल ह्यांनी एबीसी आयडी बद्दल माहिती दिली.
तसेच प्रमुख वक्ते डॉ. सचिन शेंडे, ह्यांनी एबीसी आयडी व NEP – 2020 ह्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रुती गुब्बावार, प्रास्ताविक पी. एम. उषा चे समन्वयक प्रा. अतुल बारसागडे तर आभार प्रदर्शन प्रा. राहुल ढबाले यांनी केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ. विश्वनाथ दरेकर, प्रा. निलेश दुर्गे, प्रा. डॉ. शरदकुमार पाटील, डाॅ. राजीव डांगे, प्रा. भारत सोनकांबळे, प्रा.चिन्ना पुंगाटी, प्रा. डॉ. स्वाती तंतरपाळे, प्रा.डॉ. साईनाथ वडस्कर तथा बहूसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.