पत्रकारांना सहकार्य न करणारे, जाहिरात न देणारे आणि फक्त मोफत प्रसिद्धीची अपेक्षा करणाऱ्यांना आता वृत्तपत्रांत स्थान मिळणार नाही. पत्रकारांच्या श्रमांचा अपमान करणाऱ्यांना कायमची दारे बंद करण्यात येतील, असा ठाम निर्णय पत्रकार संघटनांनी जाहीर केला आहे.
पत्रकारांचा मान नाही – तर प्रसिद्धीही नाही
पत्रकार समाजाचा डोळा आहे. त्याचे अस्तित्व जाहिरातींवर टिकते. मात्र काही संस्था व व्यक्ती पत्रकारांचा उपयोग करून स्वतःचे नाव गाजवण्याचा प्रयत्न करतात. “ज्यांना पत्रकारांचा मान नाही, त्यांना प्रसिद्धीचा हक्क नाही,” असा कडक इशारा देत पत्रकारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
जाहिरात नसेल – तर बातमीही नसेल
आगामी काळात कुणीही जाहिरात न करता किंवा सहकार्य न करता वृत्तपत्रांत बातमी टाकण्याची मागणी केल्यास त्यांची दखलही घेतली जाणार नाही. पत्रकारांचा अपमान करणाऱ्यांना समाजासमोर उघडे पाडले जाईल, असे ठणकावून सांगण्यात आले आहे.
फुकटच्या प्रसिद्धीवाल्यांना आता वृत्तपत्रांत जागा नाही!
स्थानिक पत्रकारांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, फुकटची प्रसिद्धी मागणाऱ्यांना आता वृत्तपत्रांतून कायम हद्दपार करण्यात येईल. समाजकारण, संस्था चालवणे, कार्यक्रम आयोजित करणे यासाठी पत्रकारांची मदत हवी, पण सहकार्य मात्र शून्य – अशी वृत्ती यापुढे सहन केली जाणार नाही.
“फक्त मोफत प्रसिद्धी हवी” – आता थांबवा हा स्वार्थ!
अनेक जण पत्रकारांना मान न देता फक्त आपल्या नावाच्या बातम्या छापाव्यात, अशी मागणी करतात. मात्र पत्रकारांचा वेळ, श्रम, खर्च आणि वृत्तपत्राची जबाबदारी याकडे ते डोळेझाक करतात. ज्यांना फक्त मोफत प्रसिद्धी हवी आहे, त्यांनी आता स्पष्ट समजून घ्यावे – “जाहिरात नसेल तर बातमीही नसेल.”
पत्रकारांचा ठाम निर्धार
पत्रकार संघटनांनी जाहीर केले आहे की, भविष्यात फुकट प्रसिद्धी मागणाऱ्यांचे कार्यक्रम वा नावे छापली जाणार नाहीत. पत्रकारांचा सन्मान करणाऱ्यांनाच वृत्तपत्रांत स्थान मिळेल. बाकीच्यांना समाजासमोर उघडे पाडले जाईल.