प्रतिनिधी//
*एटापल्ली:-* भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथील राष्ट्रीय सेवा योजन आणि ग्रामीण रुग्णालय एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने रा.से.यो. स्वयंसेवकांद्वारे श्रमदान मोहीम व ग्रामीण रुग्णालयासमोरील, घान कचरा, पिशव्या, ओला कचरा, सुका कचरा व रुग्णालयासमोरील परिसर स्वच्छ करण्यात आले.
या प्रसंगी श्रमदानात उपस्थित प्रोफेसर डॉ सुधीर भगत, डॉ.तुपेश उईके(वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय एटापल्ली), डॉ.विनोद पत्तिवार, डॉ विश्वनाथ दरेकार, डॉ निलेश दुर्गे, डॉ.श्रुती गुब्बावार (रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), प्रा.चिंन्ना पुंगाटी (रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) किरण चरडे, करिष्मा सोनुले, विनेश राठोड ,आशिक गोंराद्वार, विक्रम गिरावरकर,संजू बांबोडे, सुधाकर श्रीरामे, राजू कंबलवार, डिंपल सहारे, प्रियंका गुरनुले, रजनी कटरे,रेवित आंद्रस्कर, कोमल इस्टम, निर्मला श्रीरामे, सोनाली दुर्गे, पायल येगडेवार, अमोल गायकवाड, प्रणय रामटेके, प्रा.अतुल बारसागडे, प्रा.डॉ.एस.बी. वडस्कर उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी यशस्वी झाले.