आलापल्ली नागेपल्ली पाण्याची समस्यावर लवकर तोडगा काढून संबंधीत ठेकेदाराना काळ्या यादीत टाका
आलापल्ली/नागेपल्ली ग्रामपंचायत बोगस कारभाराबद्दल माजी पालकमंत्री यांना निवेदन देत कारवाईची मागणी.
*आलापल्ली/नागेपल्ली:-* ग्रामपंचायत नियमबाह्य कारभार ग्रामसभा न घेता व नोंदनीकृत कंत्राटदारांना नाकारून स्वताच्या आर्थिक स्वार्थासाठी स्वःताच्या संपर्कातील ठेकेदाराला तेदुपंत्ता युनिट देण्यात आले.व तेदुपंत्ता संकलन होऊन ४ महीने झाले. असता सुधा तेंदुपत्ता कामगारांचे पैसे मिळालेले नाही. कामगारांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कामगारांचे पैसे लवकर देण्यात यावे. अशी मागणी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांना निवेदन देत कारवाई ची मागणी केली…!
व तसेच “हर घर नल से जल” ग्रामीण योजनेत निकृष्ट दर्जाचा कामामुळे पाणी पुरवठा आलापल्ली व नागेपल्ली शहरात कित्येक वर्षे पासून बंद आहे . व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत आहे. संबंध ठेकेदाराला कारवाई करावी. व पाणी पुरवठा सुरळीत चालू करण्यात यावे.
निवेदन देताना भारतीय जनता पार्टी चे जिल्हा सचिव अभीजीत शेंडे ,युवा नेते सागर बिट्टीवार , सागर कोहळे, नागेपल्लीचे शहर उपाध्यक्ष विनोद कोटरंगे व आलापल्ली व नागेपल्ली शहरातील नागरिक व तेदुपंत्ता कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.