आझाद गणेश मंडळ अहेरी यांच्या वतीने मा. हर्षल ऐकरे साहेब (पोलिस निरीक्षक, अहेरी) यांच्या हस्ते साहित्य वाटप

265

आज दिनांक 03/09/2025, बुधवार, आझाद गणेश मंडळ अहेरी यांच्या वतीने मा. हर्षल ऐकरे साहेब (पोलिस निरीक्षक, अहेरी) यांच्या हस्ते एकलव्य निवासी मुखबधिर विद्यालय, अहेरी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

या उपक्रमात आझाद गणेश मंडळाचे सर्व सदस्य सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यात योगदान दिले.