जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला मृणाल रत्नम बनला डॉक्टर.

67

आलापल्ली (प्रतिनिधी):
विदर्भ यूथ वेल्फेअर सोसायटी संचालित डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, अमरावती येथे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या CELESTIA 2025 या समारंभात महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात आलापल्ली येथील मृणाल लक्ष्मण रत्नम यांना शैक्षणिक वर्ष २०२३–२४ या सत्रात Oral Medicine & Radiology या विषयात विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल Certificate for Distinction प्रदान करण्यात आले. तसेच अंतिम बी.डी.एस. परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करून 2nd Rank पटकावल्याबद्दल त्यांना Certificate of Merit व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. व्ही. गोंधळेकर, कार्यक्रम प्रभारी डॉ. श्रुती वानखेडे, तसेच सरचिटणीस श्री. अनिकेत इंगळे यांनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. मृणाल चे वडील लक्ष्मण रत्नम हे जिल्हा परिषद शिक्षक असून आई वंदना या गृहिणी आहेत. या यशाचे श्रेय मृणाल आपले आई बाबा, त्यांचे गुरुजन वर्ग आणि मित्र मंडळींना देतात. या यशामुळे पंचक्रोशीत मृणाला यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.