मुलचेरा चे तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद म्हशाखेत्री यांना तत्काळ निलंबित करा- भाग्यश्री ताई आत्राम यांची मागणी

396

गडचिरोली
जिल्ह्याचे महत्त्वाचे स्थान असलेल्या मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांत डेंग्यू मलेरिया या साथी च्या रोगाने थैमान घातले असून आतापर्यंत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संपूर्ण राज्यासाठी ही बाब चिंतेची असताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद म्हशाखेत्री यांनी या रोगावर नियंत्रण आणण्या ऐवजी उपाययोजना करण्याऐवजी व वरिष्ठांना माहिती न देता जिल्हा हिवताप अधिकारी या पदावर नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न केले.
स्वतः एमबीबीएस,एम.डी मोठे वैद्यकीय अधिकारी असल्या सारख्या बढाया मारून वरिष्ठांची दिशाभूल केली त्यामुळे ५ जणांना नाहक जीव गमवावा लागला त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे.
परिस्थिती आटोक्यात आणता आली असती मात्र डॉ विनोद म्हशाखेत्री यांनी उच्च पदाच्या लालसेपोटी गरिबांकडे दुर्लक्ष केले म्हणून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे आणि त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या भाग्यश्री ताई आत्राम यांनी जिल्हा परिषद गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.