शेकडो जनजाती क्रांतिकारकांच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य. जनजाती सुरक्षा मंच प्रांत प्रमुख संदीप कोरेत

393

गडचिरोलीत भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंती निमित्ताने जनजाती गौरव दिन उत्साहात

गडचिरोली :-
“देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी शेकडो जनजाती क्रांतिकारकांनी हसत-हसत आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र त्यांची नावे इतिहासात बोटावर मोजण्याइतकीच आपल्याला माहिती आहेत. हे आदिवासी समाजाच्या शौर्य दाबण्याचा प्रयत्न असो वा अनावधानाने घडलेली चूक असो, ते आता सहन केले जाणार नाही,” अशा शब्दांत जनजाती सुरक्षा मंचाचे प्रांत प्रमुख संदीप कोरेत यांनी आपली भावना व्यक्त उपस्थिताना मार्गदर्शन केले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत आयोजित कार्यक्रमाचे मुख्य वक्ता म्हणून संदीप कोरेत बोलत होते.त्यांनी पुढे सांगितले की,
“जनजाती समाजाच्या क्रांतिकारकांचा इतिहास विसरणे म्हणजे समाजाच्या मुळांना नाकारणे आहे. त्यांच्या बलिदानाशिवाय आजचे स्वातंत्र्य शक्य झाले नसते. त्यामुळे शेकडो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांचे स्मरण करून त्यांना योग्य न्याय देणे हि काळाची गरज आहे असे बोलले

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीतर्फे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा प्रकल्प स्तरीय कार्यशाळा दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा, सेमाना बायपास रोड, गडचिरोली येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात नृत्य व मान्यवरांच्या स्वागताने झाली. श्री. विनय मडावी (ज.स.सुरक्षा मंच जिल्हा संयोजक) यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प अधिकारी ए.आ.वि.प्र. गडचिरोली यांनी पण मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.

भोजनानंतर गटचर्चा (केन्द्रप्रमुख, शिक्षक, पालक) घेण्यात आली. कार्यक्रमाचे सारांश सादरीकरण करून श्री. बिनायक उके (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) यांनी समारोप केला. यानंतर आभार प्रदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.