प्रतिनिधी//
भामरागड :पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मन्नेराजाराम ग्रामपंचायत अंतर्गत बामनपल्ली गावात असलेल्या विविध अस्वच्छता,सांडपाणी आणि कचऱ्याने तुंबलेल्या नाल्यांची सफाई नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.घराच्या परिसरात तसेच वस्त्यातील नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाने जबाबदारी झटकल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे.
एकीकडे गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. किंबहुना रुग्ण दगावत आहेत. हिवतापावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन अतोनात प्रयत्न करीत आहे.आरोग्य विभाग डोळ्यात तेल टाकून सेवा देत आहे. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबविताना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः लक्ष देऊन आहेत. मात्र,मन्नेराजाराम ग्रामपंचायत कार्यालय स्वतः आपल्या अधिनिस्त गावांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत असेल तर गावकऱ्यांनी काय करावं ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मन्नेराजाराम ग्रामपंचायत
प्रशासनातर्फे या गावांत विकास कामे तर सोडा,किमान स्वच्छतेसाठीही पुढाकार न घेतल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
याचे उत्तर गावाकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही.विशेष म्हणजे मन्नेराजाराम ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या शुद्ध पाणी,नाले सफाई,कचरा इत्यादी समस्या आहेत. शासन व प्रशासन लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी करीत आहे.
*ग्रामसेवक मुख्यालयी राहण्यास खो*
मन्नेराजाराम येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून भामरागड वरून ये -जा करीत असतात. सध्या पावसाळ्यातले दिवस असून नागरिकांना कागदपत्रे काढण्यासाठी भामरागड ला जावं लागत असतो.शासन आपल्यादारी का किव्हा शासनाच्या दारी नागरिक असा प्रश्न निर्माण होत आहे.
उपस्थित बामनपल्ली चे नागरिक.
पेंटय्या चौधरी
नारायण मंत्राकुल
व्येकटी बडगेल
परदेशी निलम
रामाय्या तानसेल
सुरेश निलम
प्रेमलता तानसेल
संमका मंत्राकुल
तेजस्विनी तानसेल
आदी ग्रामस्थ उपस्थित होते.