प्रतिनिधी//
मुलचेरा तालुक्यातील गोमनी येथील प्रमुख चौकातयेणाऱ्या २१ तारखेला शिवसेने तर्फे खड्डेमुक्त रस्त्यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून त्यांचे माहिती निवेदनामार्फत मुलचेरा तहसीलदार तसेच पोलिस प्रशासन ला शिवसेना शिष्ट मंडळा तर्फे देण्यात आले आहे
मुलचेरा तालुक्यातून अहेरी उपविभागाला जोडणारा व तालुक्यातूनच जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याची झालेल्या बकाल अवस्थेला व तालुक्यातील प्रमुख रस्त्याला खड्डेमुक्त करण्यासाठी शिवसेना तर्फे
जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनात युवा नेता अहेरी विधानसभा संदीप कोरेत यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मुलचेरा यांना १८/७/२०२५ ला निवेदन देण्यात आले होते पण या निवेदनाची साधी दखल पण सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही महत्वाचे मंजे काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी गडचिरोली अहेरीत आले असता उपविभागातील बकाल रस्त्याची असलेली अवस्था बघून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणाली नाराजी व्यक्त करत चांगलेच धारेवर धरले होते तरी पण सार्वजनिक बांधकाम विभाग बेजबाबदार पने वागत असल्यामुळे त्याचा बेजबाबदारी पणा चा फटका या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर धारकांना, बस वेळेवर येत नसल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गरोदर मातांना होत असल्यामुळे रस्त्याच्या या बकाल अवस्थेमुळे जण माणसात सार्वजनिक बांधकाम विभाग तीव्र नाराजी वाढत चालली आहे त्यामुळे याचा उद्रेक २१तारखेला गोमनी येथील चौकातील आलापल्ली मुलचेरा महामार्गावर शिवसेनेचा चक्का जाम आंदोलनाने होणार आहे तरी या आंदोलनात तालुक्यातील शेकडो लोकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान शिवसेना मुलचेरा तालुका तर्फे करण्यात आले आहे हे आंदोलन शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनात युवा नेता संदीप भाऊ कोरेत यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे तरी निवेदन देताना नितेश मेश्राम आदिवासी सेल तालुका प्रमुख मुलचेरा विनोद बानोत जिल्हा अशाकीय सदस्य बंजारा व लभाना समाजाचे वेंकटेश गजलवार,विक्रम बावणे,अजय बानोत
दीपक घुगलोत,शिमोन घुगलोत, दयाकर बोळा, नरेश राठोडधर्मराव खोब्रागडे.सदाशिव सेडमाके. शामराव खोब्रागडे. अशोक कांबळे. लक्ष्मण मुजमकर. गुरुदास खोब्रागडे. मनोहर सेडमाके. शिवसेना कार्यकर्ता मोठ्या संखेने उपस्थित होते