एटापल्ली – इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारामुळे महाराष्ट्रात ऑनलाइन जुगार आणि बेटिंग व्यवसाय झपाट्याने वाढत असून, यामुळे तरुण पिढी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडत असल्याचा इशारा **ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF)** ने दिला आहे. या पार्श्वभूमीवर **AIYF गडचिरोली जिल्हा कोन्सिल** तर्फे एटापल्ली तहसील कार्यालय येथे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्रीला निवेदन देण्यात आले.
हे निवेदन **Aiyf च्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा** म्हणून देण्यात आले असून, ऑनलाइन जुगारावर तात्काळ बंदी घालावी, तसेच तामिळनाडूच्या धर्तीवर कठोर कायदा महाराष्ट्रात लागू करावा, अशी ठाम मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की IPL, क्रिकेट लीग, कॅसिनो गेम्स आणि विविध अॅप्समुळे लाखो युवक जुगाराच्या आहारी जात आहेत. यामुळे आर्थिक दिवाळखोरी, मानसिक ताण आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, दरवर्षी ३,००० पेक्षा अधिक आत्महत्यांचे प्रकार या कारणाशी संबंधित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन जुगार उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे ६ लाख कोटी रुपये असून, यात परकीय कंपन्यांचा मोठा सहभाग असल्याचे निवेदनात नमूद आहे.
**AIYF च्या मुख्य मागण्या:**
1. तामिळनाडूच्या कायद्यानुसार अशा अॅप्सच्या प्रचारावर ७ वर्ष तुरुंगवास व ५० लाख दंडाची तरतूद महाराष्ट्रात लागू करावी.
2. बॉलिवूड कलाकार, क्रिकेटपटू आणि इतर सेलिब्रिटींनी अशा जाहिराती करू नयेत.
3. महाराष्ट्रात ऑनलाइन जुगार व बेटिंग पूर्णतः बंद करावे.
4. IPL सारख्या स्पर्धांमध्ये अशा कंपन्यांच्या प्रायोजकत्वावर बंदी घालावी.
5. सोशल मीडिया, अॅप्स व वेबसाइट्सवरील अशा जाहिराती तत्काळ हटवाव्यात.
6. तरुणांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी.
7. अशा कंपन्यांच्या आर्थिक उलाढालीवर चौकशी व नियंत्रण ठेवावे.
8. राज्यात अशा कंपन्यांना दिलेले प्रोत्साहन रद्द करावे.
9. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात याचे दुष्परिणाम समाविष्ट करावेत.
AIYF गडचिरोली जिल्हा कोन्सिलच्या वतीने **कॉ. सचिन मोतकुरवार (राज्य उपाध्यक्ष)**, **कॉ. सुरज जककुलवार (कोन्सिल सदस्य)**, **कॉ. साधू कोरसा पाटील नैताला**, **कॉ. बारसु ऊईके**, **कॉ. सत्तू हेडो**, **कॉ. रमेश कवडो**, **कॉ. विलास नरोटी**, **कॉ. तेजस गुज्जलवार**, **कॉ. विनोद पदा**, **कॉ. रितेश जोई**, **कॉ. गीता दासरवार**, **कॉ. विष्णू हिचामी** आणि **कॉ. रामदास उसेंडी** यांनी स्वाक्षरी केलेले हे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.