प्रतिनिधी// रूपेश सलामे
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील तालुका मुलचेरा तालुक्यात मधील मौजा – देवडा, व मौजा मौहली हे गाव पेसा यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुकाध्यक्ष सतीश पोरतेट यांनी मा.डॉ. अशोकजी उईके साहेब आदिवासी विकास मंत्री(म.रा.) तथा पालकमंत्री चंद्रपुर जिल्हा यांच्या कडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुलचेरा तालुका अंतर्गत मौजा- देवदा, मौजा-मौहली हे दोन्ही गावे मूळ गाव असून या गावातील एकूण लोकसंखेच्या तुलनेत ५० टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. परंतू, ‘पेसा कायदा’ अंतर्गत भारत सरकारच्या राजपत्रातील गावांचा यादीत हे गाव समाविष्ट नसल्याने येथील नागरिकांना नौकरी व इतर लाभांपासून वंचित राहावे लागत असून मौजा- देवदा, मौजा-मौहली या गावांना पेसा कायदा अंतर्गत भारत सरकारच्या राजपत्रातील पेसा गावांच्या यादीत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा तालुकाध्यक्ष सतीश पोरतेट यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी केली आहे.