जनतेचा मालकीचा नगरपंचायत कार्यालय मधून जनतेला दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा – भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा

341

**एटापल्ली (प्रतिनिधी)//
एटापल्ली नगरपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेले **भारतीय न्याय संहिता (BNS)** कायद्यावरील बॅनर चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. सामान्य जनतेमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या बॅनरविरोधात **भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा)** व **ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF)** ने तीव्र निषेध व्यक्त केला असून, **नगराध्यक्ष व नगरपंचायत अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा** देण्यात आला आहे.

**सदर बॅनरमध्ये** BNS अंतर्गत काही निवडक कलमे जसे की – कलम 69 (सरकारी कामात अडथळा), कलम 356 (वाद घालणे), कलम 117 व 120 (मारहाण), कलम 324 (गर्दी करणे) आदींचा उल्लेख करत, सरकारी कर्मचाऱ्यांना अडथळा आणल्यास शिक्षेची भीती दाखवण्यात आली आहे.

**भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार** यांनी म्हटले की,

> “सदर बॅनर शासन निर्णयाशिवाय लावण्यात आला असून, तो बेकायदेशीर आहे. नगरपंचायत सारख्या शासकीय व सार्वजनिक कार्यालयात असा बॅनर लावणे म्हणजेच जनतेला दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की,

> “हा बॅनर लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून, जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात आहे. नागरिक जर कार्यालयात येऊन आपल्या अडचणी, तक्रारी मांडत असतील तर त्यांना ‘गुन्हेगार’ ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही.”

**शासकीय निधीचा वापर करून** बॅनर छापणे व लावणे म्हणजे **निधीचा दुरुपयोग** असल्याचेही मोतकुरवार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी यासंबंधी शासन निर्णय (GR) मागवला असून, तो २४ तासांत न दिल्यास आणि बॅनर हटवण्यात आला नाही तर **भाकपा नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे जाहीर केले.**

**या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून**, नगरपंचायत कार्यालय जनतेचे असून ते कोणत्याही पक्षीय प्रचारासाठी वापरणे अयोग्य असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले.

**📌 विशेष:**
भाकपाच्या निवेदनामुळे प्रशासन अडचणीत आले असून, या बॅनरवरून पुढील काही दिवसांमध्ये वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.कॉ तेजस गुज्जलवार शहर सचिव भाकपा एटापल्ली