पेसा समाविष्ट गावातील यादीत मौजा- लगाम हेटी चे मौजा-लगाम म्हणून उल्लेख करण्यात यावे

333

प्रतिनिधी// रूपेश सलामे

गडचिरोली :- भारत सरकारचा राजपत्रातील पेसा समाविष्ट गावातील यादीत मौजा- लगाम हेटी चे नाव बदलवून मौजा-लगाम म्हणून उल्लेख करण्यात यावा अशी मागणी मा.डॉ. अशोकजी उईके साहेब आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा च्या वतीने करण्यात आली.
सविस्तर असे की,
लगाम-हेटी हे भारत सरकारचा ‘पेसा कायदा’ अंतर्गत गावाच्या यादीत समाविष्ट आहे.कालांतराने गावाचा विस्तार होत गेला व येथील नव्याने निर्माण झालेल्या वस्तीला लगाम (माल) असे नाव देण्यात आले.
परंतु, लगाम लगाम-हेटी आणि लगाम (माल) हे दोन्ही मौजा लगाम ता. मुलचेरा जिल्हा गडचिरोली या एकाच गावाचे दोन भाग आहेत.
परंतु महाराष्ट्र सरकारने दोन्ही वेगवेगळे गाव आहेत असे समजून ‘पेसा कायदा’ अंतर्गत गावाच्या यादीत नाव नसल्याचे कारण दाखवून पेसा कायदा अंतर्गत येणाऱ्या नौकरी व इतर लाभापासून मौजा लगाम येथील नागरिकांना वंचित राहावे लागत आहे.
यामुळेच, भारत सरकारचा राजपत्रातील पेसा समाविष्ट गावातील यादीमध्ये मौजा- लगाम हेटी चे मौजा-लगाम असे उल्लेख करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा, तालुकाध्यक्ष सतीश पोरतेट यांनी केली आहे. यावेळी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.