हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केले “रेड अलर्ट” जारी झाल्याने सावध राहण्याचे आवाहन केले

330

प्रतिनिधी//

*अहेरी:*- बुधवार पासून सतत पाऊस येत असल्याने आलापल्ली येथील फुकट नगर मध्ये पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. लगेच आलापल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागरिक स्थलांतरित झाले. पावसामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार यांनी गुरुवार 24 जुलै रोजी माजी पंचायत समिती सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांना दिले. लगेच युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम व डॉ.मिताली आत्राम यांनी आलापल्ली येथे धाव घेऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केले व नागरिकांशी संवाद साधले.
आलापल्ली येथील फुकट नगर कॉलनीत पावसामुळे घरात पाणी शिरल्याने घरातील सर्व वस्तूंची नासधूस झाले आहे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तेथील गोर गरीब नागरिकांना धान्याचे किट देणार असल्याचे हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे.
तसेच हवामान विभाग नागपूरने 23 व 24 जुलै गडचिरोली जिल्हा “ऑरेंज अलर्ट” तर अजून पुढील दोन दिवस म्हणजेच 25 व 26 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविले असून “रेड अलर्ट” जारी केले आहे त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगून जिवाच्या सुरक्षितेची काळजी घ्यावे असे आवाहन हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांनी केले आहे.