प्रतिनिधी//
आलापल्ली : येथील काल सायंकाळी दुदैव घटना घडली आहे.शिक्षक शंकर गावडे ( वय 55 वर्ष ) हे रस्ता पार करून पायी जात असतांना कुमार ट्रान्सपोर्ट नागपूर येथील ट्रक मागून शिक्षक शंकर गावडे यांना जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झालं.
नातेवाईकांकडे लग्न समारंभ असल्याने शिक्षक शंकर गावडे हे आपल्या पत्नीसह आलापल्ली येथील मुख्य बाजारात आले होते.त्यांची पत्नी ही सामान खरेदी करण्यासाठी गेली व गावडे गुरुजी आपल्या सवंगडी शिक्षका सोबत चहा घेण्यासाठी थांबले.
चहा घेऊन ते बुट पाॅलीश करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जात असतांना मागून ट्रकने धडक दिल्याने त्यांची जागीच मृत्यू झाला.ही घटना त्यांचे पत्नीला समजताच त्या धो म्हणून रडत होत्या.हे चित्र मनाला हेलावून घेणारे होते.त्यांचे या अचानक जाण्याने गावडे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
शिक्षक शंकर गावडे यांचा मृतदेह पोस्टमॉडम करण्यासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आल्यांची माहिती आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांना होतच तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होऊन गुरुजींचा पोस्टमॉडम होईल पर्यंत उपस्थित राहून सरकारी स्वर्गारथ गाडी उपलब्ध करून देऊन शिक्षक शंकर गावडे यांचा शव स्वागवी पाठवण्यात आली.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,बबलू सडमेक सर,रवी येमसलवार सर,अविनाश सडमेकसह परिवारातील नातेवाईक आदी उपस्थित होते.