मुलचेरा तालुक्यात अल्प भू-धारक शेतकरी शेती तर करतात परंतु हक्कापासून वंचित

197

प्रतिनिधी//

मुलचेरा :- तालुक्यात मौजा बारसवाडा, बंदूकपल्ली, गावातील काही काही अल्प भू-धारक शेतकरी असून गेल्या अनेक वर्षापासून पिडो- पिढ्या शेती करत आहे. परंतु त्या शेतकऱ्यांना आजवर शासनाने शेतमालकाला ठोसपुरावा दिलेला नाही ही जमीन आजोबा परजीत पासूनची आहे आजच्या या दिवसाला ती आजोबांनी अतिक्रमण केलेली शेती आज ही शासन दाखवतो रेकाडला अतिक्रम असल्याचे शासनानी सन 2001ते 13/6 /2002 स*** या सगळ्या शेतकऱ्यांचे शेत मोजणी करून मौजा बारसवाडा, बंदूकपली येथील रा.मा. क्र./166/एल.इ. एन.39/20012002 नुसार स.न.164 आराजी दोन हेक्टर 21 वर आहे शेतीचे अतिक्रमण दंड वसूल करण्यात तर आले परंतु आजही मालकी हक्काची झालेली नाही त्यानंतर शासनाने गावोगावी वन हक्क समिती स्थापित केल्या त्या जागेचे वन हक्क समिती आणि मना विभागाकडून मोजमाप करण्यात आले वन हक्क समितीकडे दावेही सादर करण्यात आले. त्यावेळेस गरीब शेतकऱ्यांना तुम्हाला शासनाकडून नमुनासात नमुनाबारा मिळेल अशी आशा दिली परंतु शासनाने आजवरी एकही शेतकऱ्याला न्याय दिला नसून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे असा प्रश्न अल्पभूधारक शेतकऱ्यांना पडलेला आहे