शिवसेना अहेरी तालुका प्रमुख अक्षय करपे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम मजूर महिलांना साडी वाटप व रुग्णालयात फळ वाटप

336

प्रतिनिधी//

अहेरी :- शिवसेना शिंदे गट पक्षाचे अहेरी तालुका प्रमुख अक्षय करपे यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवुन साजरा करण्यात आले आहे.
अक्षय करपे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीपभाऊ कोरेत यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम पंचायत आलापली येथील मजूर महिलांना साडी वाटप केले तसेच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
अक्षय करपे यांनी शिवसेना वाढी साठी सतत प्रयत्नशिल असतात.यांचे वाढदिवसानिमित्त गोर गरीब महिला मजूर वर्गाना साडी वाटप करण्यात आल्याने महिलांना आनंद झाला आहे .मजूर महिलांनी अक्षय करपे यांना पुढील राजकीय वाटचालीस व सुखी जीवनासाठी आशीर्वाद दिला व उपक्रम बद्दल कौतुक केले.
याप्रसंगी शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीपभाऊ कोरेत ,अक्षय करपे, अमीत बेझलवार आणि शिवसेना पक्षाचे जिल्हा व तालुका कार्यकर्ते उपस्थित होते.