प्रतिनिधी//
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी नक्षलग्रस्त कमलापूर येथे 1952 मध्ये श्री गुरुदेव आश्रम शाळेची निर्मिती केली. आज ती शाळा गुरुदेव व्यायाम शिक्षण व सेवा प्रसारक मंडळ, गडचिरोली द्वारा चालविली जात आहे. मात्र, या शाळेत मागील काही दिवसांपासून अल्पवयीन आदिवासी मुलींवर शिक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांकडून अश्लीश चाळे तसेच गैर वर्तणूक केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत नुकतेच पीडित मुली आणि त्यांच्या पालकांनी रेपणपल्ली उप पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. संबंधित संस्थेने देखील या गंभीर बाबीची दखल घेत ‘त्या’ दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी यापूर्वी देखील एका चतुर्थ श्रेणी कर्मचान्यांकडून असाच प्रकार घडल्याची माहिती येथील विद्याथ्यांनी सांगितली आहे. त्यामुळे श्री गुरुदेव आश्रम शाळेत नेमका चाललंय तरी काय ? असा सवाल सरपंचा रजनीता मडावी यांनी उपस्थित केला आहे.अश्या प्रकारना मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जिल्ह्यातील एकमेव आश्रम शाळा तसेच संत नगरी म्हणून ओळख असलेल्या कमलापूर गावाची बदनामी होत आहे. असले कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून या पूर्वी घडलेल्या घटना सुद्धा उघडकीस आणून ती शाळा शासन जमा करावी.अन्यथा गावकाऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इसारा सरपंच रजनीता मडावी यांनी दिला आहे.शासनाने त्वरित शाळा शासन जमा करावी अश्या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी गडचिरोली यांना देण्यात आले आहे.