सीएसआर फंड अंतर्गत महिलांना शिलाई मशिनचे वाटप – पर्यावरण फांऊडेशन व अस्तित्व बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचा उपक्रम.

120

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

उमरेड (नागपूर) -महिलांच्या सबलीकरणासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. महिलांनी आपल्या स्वतः पायावर उभे राहावे म्हणून सुशिक्षितर बेरोजगार महिलांसाठी केंद्र शासनाच्या सीएसआर फंड अंतर्गत पर्यावरण फांऊडेशन व अस्तित्व बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, वासाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने नागपूर जिल्हातील उमरेड तालुक्यातील महिलांना स्वालंबी होवून त्यांना रोजगार मिळावा यासाठी उत्कृष्ट उपक्रम राबवित आहे. पर्यावरण फांऊडेशन व अस्तित्व बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या उमरेड ग्रामीण व शहरी भागातील महिलांना दि. 27/03/2025 गुरुवारला रोजी शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. या योजनेमध्ये 18 ते 45 वयोगटातील महिलांना 5 दिवसीय प्रशिक्षण देवून 70 टक्के अनुदानावर सीएसआर फंड अंतर्गत उमरेड शहारात राबविण्यात आलेल्या पहिल्या तुकडीच्या 20 महिलांना उमरेड शहरातील घोडीमारे लेआऊट येथील संस्था कार्यालयात शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले आहे. तसेच प्रशस्ती प्रत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले अस्तित्व बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, वासाळा श्री. अमित रामटेके, प्रमुख पाहुणे अस्मिता नगराळे, उमरेड, पायल वंजारी रामटेक, विनया नंदेश्वर उमरेड, रविंद्र खोब्रागडे कुही, विनोद नंदेश्वर उमरेड यांच्या उपस्थिती होती. याप्रंसगी व अस्तित्व बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, वासाळा श्री. अमित रामटेके यांनी उपस्थित महिलांना योजनेचा लाभ कसा घेता येईल याप्रसंगी मार्गदर्शन केले. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला या नागपूर जिल्यातील रहिवासी असणे आवश्यक असून, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, एका कुंटूंबात फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमधून महिलांनी शिलाई मशिनचा लाभ घेतलेला नसावा, या योजनेमध्ये महिलांना पाच दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधणकारक असणार आहे, सदर योजनेचा लाभ घेण्याासाठी आधार कार्ड, पैन कार्ड, दोन पासपोर्ट व बँकेची पासबुकची झेराक्स प्रत नोंदणीसाठी आवश्यक आहे, सदरील योजनाच्या अधिक माहितीसाठी महिलांनी अस्तित्व बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, उमरेड अमित रामटेके (9834377452), विनया नंदेश्वर उमरेड (9637057320), पायल वंजारी रामटेक (8421469686), विनोद नंदेश्वर भिवापूर (9764983815), रविंद्र खोब्रागडे कुही (9850037816) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. सदरील कार्यक्रमास महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.