सरकार बदलतात पण जिल्हा परिषद शाळांच्या समस्या कायम राहतात

334

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*मुलचेरा:-* तालुक्यातील शांतिग्राम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथ.शाळा गीताली शाळा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. ज्या शाळेला एक शौचालय नाही एक साईटला कंपाऊंड नाही व स्वयंपाकगृहला छत नाही शाळेकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे जिल्हा परिषद शाळा शौचालय धोकादायक अवस्थेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी शिक्षण विभाग कोट्यवधीचा खर्च करत आहे. मात्र शाळांमधील मूलभूत सुविधांकडेच दुर्लक्ष होत असल्याने दिसून येत आहे.

व गोरगरिबांसाठी जिल्हा परिषद शाळा महत्त्वाच्या आहेत. मात्र या शाळेकडे शिक्षण विभाग यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही,

तर जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधा, पाणी, स्वच्छतागृह हे देखील उपलब्ध नाही असा आरोप देखील गावकरी व अहेरी विधानसभा क्षेत्राचे सोशल मीडिया अध्यक्ष गोपाल कविराज यांनी केला…