चौडमपल्ली येथील महाकाली मंदिरात मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा नितु जोशी यांच्या हस्ते गावकऱ्यांना रेशन साहित्याचे वितरण.

196

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी:

आल्लापल्ली-चंद्रपूर मार्गावर चौडमपल्ली नजीक महाकाली मंदिर असून या ठिकाणी नेहमी दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
येथील महाकाली मंदिराची देखरेख गावकऱ्यांमार्फत केली जाते . मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष नीतू जोशी ह्या मार्गावरून प्रवास करत असताना मंदिरात दर्शनासाठी थांबल्या. महाकाली मातेचे दर्शन घेऊन त्यांनी तेथील मंदिराची देखरेख करणाऱ्यांसोबत हितगुज केली.
त्यासोबतच गावकऱ्यांना रेशन साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये तांदूळ,तेल,डाळ,तिखट, मीठ ई. चा समावेश आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून मियाम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थी, महिला,बेरोजगार युवकांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असून त्यांना त्यांचा फायदा होतो आहे.
यावेळी त्यांच्या सोबत नितीन मेहता, रोहित तरैवार,प्रतीक येन्नमवार,मंगेश आत्राम,सौरभ मडावी आदी सह गावकऱ्यांची उपस्थिती होती.