मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी : तालुक्यातील सिलमपल्ली येथील सि.सि.सिलमपल्ली द्वारा भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमाचे सहउदघाटक म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी हे होते.अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम,एम.के.तिम्मा सर,आनंदराव तलांडे,श्रीनिवास गावडे हे होते.
सदर व्हाॅलीबाॅल सामन्यासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.द्वितीय पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम कडून तसेच तृतीय पारितोषिक वनविभाग मरपल्ली,काँग्रेस कार्यकर्ते गुज्जा गावडे कडून देण्यात येत आहे.
यावेळी लिंगा वेलादी माजी सरपंच,तारक्का आसम माजी सरपंच ग्रामपंचायत उमानूर,हणमंतू कोरेत माजी सरपंच ग्रामपंचायत मरपल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,शामराव गावडे,जयराम आत्राम,बापू सडमेक,नीलम काका,श्रीनिवास राऊत,मुरारी काका,बापू बेडकी,नरेंद्र गर्गम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्य गावकरी व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.