नवेगाव येथे रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे भाग्यश्री ताई व शाहीन भाभी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

40

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

**स्वर्गीय चाचम्मा हकीम स्मृती पित्यार्थ आयोजित जगदंबा क्रिकेट क्लब नवेगाव तर्फे नवेगाव येथे रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन माननीय भाग्यश्री ताई यांच्या हस्ते संपन्न झाले**
**उद्घाटन प्रसंगी भाग्यश्री ताई यांनी आपल्या भाषणात स्पर्धेच्या महत्त्वावर आणि क्रीडायुक्त समाजाच्या निर्मितीबद्दल भाष्य केले. त्यांनी क्रीडकांला प्रोत्साहित करत म्हटले, “क्रीडा केवळ शारीरिक ताकद वाढवते असे नाही, तर ती समाजाच्या एकतेचा, समन्वयाचा आणि सद्गुणांचा आदान-प्रदान करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. आपला देश आणि समाज क्रीडामध्ये असलेली एकता आणि सामूहिक भावना यावर आधारित आहे अशी भावना व्यक्त केली**
**शाहीन भाभी यांनी देखील आपल्या भाषणात क्रीडाक्षेत्रातील सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. “क्रीडा हे केवळ स्पर्धा नसून आत्मविश्वास, परिश्रम, आणि नेतृत्व गुण शिकवते. या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू आणि क्रीडाप्रेमी एकाच ध्येयाने प्रेरित होऊन आपली क्रीडा क्षमता साधून एकमेकांचे मार्गदर्शन करणार आहेत. अशी भावना व्यक्त केली**”
**यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वन वैभव मंडळाचे अध्यक्ष अब्दुल जमीर हकीम ( बबलू भैया )वेलगुर, तसेच अहेरीचे प्रतिष्ठित नागरिक राजू सावकार उत्तरवार, उपसरपंच उमेश भाऊ मोहुर्ले, मिलींद अलोणे, माधुरी गुहूकर, जयश्री चिल्लरवार, ऍड दागावकर, दामोदर मोहुर्ले, प्रभाकर रोडे पोलिस पाटील, तुळशीराम गुरनूले, यादव झोडे, नागोराव सोनुले, आदिलभैया पठाण, वामन मडावी, भगवान गुरनूले, विजय गुरनूले, भारत शेंडे, अंबादास लोणबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते**
**कार्यक्रमाचे संचालन संजय मोहुर्ले यांनी केले आणि आभार अशोक शेंडे यांनी मानले. मंडळाचे अध्यक्ष रोहित मोहुर्ले, उपाध्यक्ष म्हणून मनोरंजन विश्वास, सचिव म्हणून मारोती मोहुर्ले, तसेच क्रीडाप्रमुख विराट मोहुर्ले यांनी देखील कार्यक्रमात योगदान दिले**
**ही स्पर्धा ग्रामीण क्रीडा क्षेत्रात एक सकारात्मक व उत्साही वातावरण निर्माण करणार आहे, ज्यामुळे नवेगावचे क्रीडाप्रेमी एकत्र येऊन या स्पर्धेत भाग घेऊन क्रीडा कौशल्याची प्रकट करणार आहेत**