पोलीस मदत केंद्र पेनगुंडा च्या वतीने भव्य जनजागरण मेळावा संपन्न

30

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

भामरागड: गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे वतीने    
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा.श्री.निलोत्पल सो. पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा.श्री.यतीश देशमुख सो . ( अप्पर पो.अधीक्षक अभियान) गडचिरोली,मा. श्री. एम रमेश सो.(अपर पो. अधीक्षक  प्रशासन ) ,गडचिरोली, मा.श्री. श्रेणिक लोढा अप्पर पोलिस अधीक्षक अहेरी,मा.श्री. अमर मोहिते सो.उपविभागीय पोलिस अधिकारी, भामरागड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस मदत केंद्र पेनगुंडा येथे दिनांक   11/02/2025 रोजी
भव्य आरोग्य मेळाव्याचे *”  आयोजन करण्यात आले.
सदर मेळाव्याचे अध्यक्ष मा श्री. तंगा चामी सा. Ac crpf 113
उद्घाटक मा श्री. अश्विन रडके शालिनीताई मेघे रुग्णालय नागपूर, प्रमुख पाहूणे म्हणून मा. डॉ.दीपक घुठे शालिनीताई मेघे रुग्णालय नागपूर,मा.श्री. अजय ठाकरे शालिनीताई मेघे रुग्णालय नागपूर, मा. श्री. राजीव वरभे शालिनीताई मेघे रुग्णालय नागपूर, मा. चंदू महाका गाव प्रमुख परेनार, मा. श्री. लालसू महाका पेनगुंडा, मा.श्री. दलू महाका महाकापाडी, यांच्या प्रमुख उपस्थितीत  भगवान बिरसा मुंडा च्या प्रतिमेला दिप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. 
      आरोग्य मेळाव्याचे प्रमुख अतिथी यांनी आरोग्य संदर्भात विषयक माहिती दिली. तसेच ,सहा.पो.नि. गणेश फुलकवर सा. यांचे उपस्थित नागरिकांना पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजना त्यासाठी लागणारे कागदपत्र बद्दल माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले.
सदर आरोग्य मेळाव्यामध्ये पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून हद्दीतील नागरिकांना
कास्ट प्रस्ताव ऑनलाईन अधिवास प्रमाणपत्र , उत्पन्न दाखला ,सातबारा प्रमाणपत्र आयुष्यमान कार्ड, pm किसान योजना, आभा कार्ड  ,पॅन कार्ड
योजनाचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पोशी/5955 संतोष करमे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोउपनि/ जीवन खांडेकर यांनी केले.
हद्दीतील लोकांना विविध शासकीय योजना लाभ देण्यात आले खालील प्रमाणे
1) पॅनकार्ड = 10
2)  इ श्रम्र कार्ड= 03
3)  Total opd=142
4)  RBS= 74
5)  ECG = 24
6) MENO =03
7) DR REFAR =20
8) बैंक अकाऊंट = 11
तसेच वैद्यकीय टिमद्वारे नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून औषध उपचार देण्यात आले.
   वरील प्रमाणे शासकिय योजनांचा आरोग्य मेळाव्यात उपस्थित नागरिकांना लाभ देण्यात आला.
 सदर आरोग्य मेळाव्यामध्ये पोलिस मदत केंद्र पेनगुंडा हद्दीतील एकूण 200 ते 250 च्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्वाना जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
       सदर जनजागरण मेळावा यशस्वी होण्यासाठी पोलिस मदत केंद्र पेनगुंडा येथील जिल्हा पोलीस चे सर्व अधिकारी व अंमलदार, तसेच सिआरपीएफचे अधिकारी व अंमलदार, एसआरपीएफ अधिकारी व अंमलदार यांच्या सहकार्याने आरोग्य मेळावा शांततेत पार पडला.