मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
आज रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान पोलीस अंमलदार महेश कवडू नागुलवार , नेमणूक- विशेष अभियान पथक गडचिरोली, वय- 39 वर्षे, रा- अनकोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली हे जखमी झाले होते. त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून तातडीने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली आहे.
उद्या दिनांक 12/02/2025 रोजी त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात त्यांचे मूळ गाव मौजा अनकोडा ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे करण्यात येणार आहे.
गडचिरोली पोलीस दल शहिद पोलिस अंमलदार महेश कवडू नागुलवार यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.