पोलीस स्टेशन सिरोंचा येथे आरोग्य मेळाव्याचे आयोजन

72

सुरेश एम तिट्टीवार सिरोचा प्रतिनिधी

         दि. 09/12/2024 रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा.श्री. निलोत्पल सा. पोलीस अधीक्षक गडचिरोली ,मा. श्री. एम रमेश सा.(अपर पो.अधीक्षक  प्रशासन) ,मा.श्री.यतीश देशमुख सा . ( अप्पर पो.अधीक्षक अभियान) गडचिरोली, मा. श्री. लोढा सा. अपर पोलीस अधीक्षक (प्राणहीता ) अहेरी, यांच्या संकल्पनेतून व मा.श्री. संदेश नाईक सा.उपविभागीय पोलिस अधिकारी सिरोंचा , यांचे मार्गदर्शनाखाली  पोस्टे सिरोंचा येथे “*आरोग्य मेळाव्याचे*”  आयोजन करण्यात आले.
     सदर आरोग्य मेळाव्याचे अध्यक्ष पोनी समाधान चव्हाण साहेब प्रभारी अधिकारी पोस्टे सिरोंचा तर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . आदित्य सपकाळ ग्रा. रु. सिरोंचा , डॉ. प्रशांत पासुला नेत्र तज्ञ (खाजगी ), जिल्हा पोलिस अधि./अंम. SRPF अधि./अंम. व हद्दीतील 120 ते 150 नागरिक उपस्थित होते. 
               सदर आरोग्य मेळाव्याची सुरुवात क्रांतीवीर शहीद भगवान बिरसा मुंडा,यांच्या प्रतिमेस पाहूण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून आरोग्य मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.       
सदर आरोग्य मेळाव्याचे प्रमूख पाहूणे डॉ . आदित्य सपकाळ ग्रा. रु. सिरोंचा यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष प्रभारी अधिकारी श्री.समाधान चव्हाण सा. यांनी मार्गदर्शन केले.
  *   सदर आरोग्य मेळाव्याला उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी, शेतकरी व नागरिकांना खालील उपयोगी साहित्य वाटप  करण्यात आले.
1) ब्लॅंकेट – 65
2) चस्मा – 11

*सदर मेळाव्यात खालील प्रमाणे आरोग्य तपासणी करण्यात आली*

        सदर आरोग्य मेळाव्यात उपस्थित सर्वाना जेवण ची व्यवस्था करण्यात आली.
       सदर आरोग्य मेळाव्याचे सूत्र संचालन पोउपनि मारोती नंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोस्टे सिरोंचा येथील जिल्हा पोलीसचे  सर्व अधिकारी , अंमलदार, तसेच एसआरपीएफचे अधिकारी अमलदार व spo यांनी मोलाचे सहकार्य केले .
सदर मेळावा 10.00 वा. सुरू करून 15.00 वा. यसस्वीरित्या कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पाडण्यात आला.

समाधान चव्हाण
प्रभारी अधिकारी
पोलीस स्टेशन सिरोंचा