मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
एटापल्ली तालुक्यातील गट्टा ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. भाकपाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य कॉ. सूरज जककुलवार यांनी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या घोटाळ्याबद्दल दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी केलेल्या PHC औषधांच्या बाबतीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी पंचायत समितीने केलेल्या चौकशीत सरपंच पूनम कोमटी लेकामी दोषी आढळून आले आहेत. तसेच, उपसरपंच महारू लेकामी यांनाही या संपूर्ण गैरव्यवहाराची कल्पना होती परंतु सदर गैरव्यवहार ची माहिती किंवा तक्रार ग्रामपंचायत किंवा पंचायत समिति कडे त्यांनी केली नाही यावरून आपल्याला समजते की त्यांची या सर्वात साथ होती असे अहवाल वरुण लक्षात येते. जककुलवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार , पंचायत समितीने या प्रकरणाची चौकशी केली. चौकशी अहवालानुसार, सरपंच ग्रामपंचायतीने औषध खरेदीसाठी खर्च झालेल्या रकमेचे कोणतीही निविदा प्रक्रिया राबवली नाही व खरेदी प्रक्रियेत अनियमितता केली असल्याचे स्पष्ट होते तसेच ग्रामपंचायत दफ्तरी, प्रमाणके, साठा रजिस्टर व साहित्य उपलब्द सादर केलेले नाही आणि अहवालात सरपंच आणि सचिव चे म्हणे होते कि औषधी आली परंतु औषधी कोणास वितरित केले याबद्दल नोंद नाही तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनीही या काळात ग्रामपंचायत गट्टा कडून कोणतीही औषधे खरेदी केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.या गंभीर आरोपांनंतर गैरव्यवहार झाले असे स्पष्ट होते याला संयुक्तरित्या सरपंच, सचिव जवाबदार आहे असे अहवालात उल्लेख केला असून, त्यांनी निधीचा गबन केला आहे. सचिवांच्या बयाणामध्ये त्यांनी सांगितले कि औषधी प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टाला दिले व त्यावेळी उपसरपंच महारू लेकामी उपस्थित होते असे सांगितले यावरून स्पष्ट होते कि त्यांना याबद्दल माहिती होती व परंतु त्यांनी सुद्धा याची माहिती किंवा तक्रार ग्रामपंचायत किंवा पंचायत समिति कडे केली नाही हा गैरव्यवहार लपवून ठेवला व उपसरंच ला याची माहिती होती हे यातून स्पष्ट होते म्हणून गट्टा परिसरातील नागरिकांकडून सरपंच,उपसरपंच यांची राजीनाम्याची मागणी होत आहे व तसेच
या प्रकरणी भाकपाने सरपंच आणि उपसरपंच यांच्या पदावरून हकालपट्टी करण्याची आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पंचायत समितीने या मागणीबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.