अपघात ग्रस्ताला मिळालातात्काळ मदत स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली

306

आलापल्ली : रोजी 31/08/2024 ला दामोदर बाबुराव ठाकरे राहणार नवेगाव बाळापुर हे गणेश चतुर्थी निमित्त लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्या करिता आलापल्ली येथे आले होते सामान घेऊन परत स्वगावी नवेगाव (बाळापुर) जाण्याकरिता दुचाकीने निघाले होते आलापल्ली वरून पाच किलोमीटर अंतरावर जाताच त्यांच्या विरुद्ध दिशेने येत असलेल्या चार चाकी वाहन (पिक अप) नी ह्यांच्या दुचाकी ला धडक दिली व त्यात दामोदर बाबुराव ठाकरे हे गंभीर जखमी झाले.तिथे उपस्थित असणाऱ्यांनी रुग्णवाहीके साठी कॉल केलं पण त्यावेळी कोणतीच रुग्णवाहिका रुग्णालयात उपलब्ध नव्हती मग त्या लोकांनी स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला व अपघात झाल्याचं सांगितले तसेच स्वराज्य फाउंडेशनच्याा पदाधिकारी यांनी तत्काळ
स्वराज्य फाउंडेशनची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली व गंभीर जखमी असलेल्या दामोदर ला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पोहोचवण्यात आले तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले