प्रतिनिधी//
सीमेवरील सिरोंचा येथील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून 37 व्या दिवशीही साखळी उपोषण सुरू आहे. आम्ही जमीन दिलो
तर जमिनीचे मोबदला कधी देणार, प्रकल्पाचे पाणी हैदराबाद पर्यंत तेलंगणा नेत आहे तर प्रकल्पाचा बाजूला असलेल्या सिरोंचा तालुक्यातील गावांना महाराष्ट्र सरकार का बरं पानी उपलब्ध करू देवू शकत नाही, मेडिगड्डा करारानुसार २०% पानी आपल्या हक्काचा आहे. झिंगानूर सारख्या अनेक गावांत सध्या पाण्याची टंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, 128 हेक्टरचे भुसंपादन तीन वर्षापासून स्थगित आहे
. त्याचाच मोबदला महाराष्ट्र सरकार मिळवून देण्यास एवढा कालावधी लावत आहे,तर 128 हेक्टर पेक्षा अधिकधम शेतजमीन ब्याकवाटर ने बुडत असल्याबाबत आक्षेप शेतकऱ्यांनी नोंदविला आहे त्या शेतजमिनींचा भुसंपादन कधी होणार अशा विविध मागणी घेऊन शासनाचा लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचे सिरोंच्या तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण सुरू
आहे. या उपोषणाला व्येंकटेश तोकला लम्क्षण गणपुरपू सत्यम गड्डम मुत्यालु तोकला यांचा समावेश असून रोज वेगवेगळे शेतकरी उपोषण करत आहेत.