मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी:*तेजेश गुज्जलवार
*एटापल्ली:* तालुक्यातील विज्ञान मेळाव्यात यावर्षी संस्कार पब्लिक स्कूल च्या कु. अक्षरा मुडमादीगेला हिने उल्लेखनीय यश मिळवले. या स्पर्धेत अक्षराने आपले AI वर आधारित वैज्ञानिक प्रकल्प सादर केले, ज्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला. तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री निखिल कुमरे सर याचे हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
या यशामुळे विद्यार्थिनींनी शाळेचं नाव उंचावलं आहे. संस्थापक श्री विजय संस्कार , शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा संस्कार आणि शिक्षकांनी विद्यार्थिनींचं तसेच तिचे मार्गदर्शक श्री सुदर्शन मारगोनवार सर यांचं अभिनंदन केलं असून, त्यांनी मेहनत, जिद्द आणि प्रज्ञेला यशाचं गमक मानलं आहे. या यशामुळे विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थिनींच्या या यशामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचं वातावरण आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने देखील या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले असून, या विजयामुळे पुढील विज्ञान स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
कुं. अक्षरा मुडमादीगेला ला पुष्प गुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना शिक्षण विस्तार अधिकारी श्री निखिल कूमरे सर