झाडीपट्टी कलावंत संघटनेची कार्यकारिणी पुनर्गठीत

61

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*आमगाव* (वडसा) झाडीपट्टी मधील संपूर्ण कलावंतांचे एकत्रिकरण, त्या कलावंतांच्या विविध समस्यांचे निराकरण आणि त्या कलावंतांच्या प्रगतीसाठी अनेक मार्गांची निर्मिती करता यावी या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या झाडीपट्टी कलावंत संघटनेची सभा दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळीं ११:०० वाजता श्री राम मंदिर आमगाव येथे आयोजित करण्यात आली. या आमसभेत अपेक्षित सदय कलावंत उपस्थित नसल्याने सभा तहकूब करण्यात आली व कोरम अभावी 1 तास सभा तहकूब करून ठीक 12.30 वाजता आमसभा सुरू करण्यात आली. या सभेत नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. या मध्ये अध्यक्ष- शेखर पटले, उपाध्यक्ष- प्रियंका गायधने, सचिव – अंकुश पेटकर, कोषाध्यक्ष – मंगल मशाखेत्री, कार्याध्यक्ष – कीरपाल सयाम, सहसचिव – उत्तम उके, प्रसिद्धीप्रमुख – प्रणय देवगडे, जिल्हा उपाध्यक्ष,चंद्रपूर – श्री.विशाल बावणे, गडचिरोली – श्री.अंबादास कांबळी, भंडारा – श्री.राज बोधनकर, गोंदिया – श्री.किशोर भाग्यवंत, सदस्य – सौ.निशा धोंगडे – चंद्रपूर, श्री.गिरीशचंद्र भूरें – गडचिरोली, सौ.प्रतिभा साखरे – भंडारा, श्री.चेतन वडगाये – गोंदिया, मुख्य मार्गदर्शक- पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, श्री.देवेंद्र दोडके, श्री.के.आत्माराम, श्री.राजेश चिटनिस, डॉ.श्री.दिनकर चौधरी, डॉ.प्रवीण सहारे, श्री.वासु कुमार मेश्राम, श्री.यशवंत ढोरे यांची निवड करण्यात आली. या सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटनेची पुढील सभा दिनांक ०८ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.