एटापल्ली तालुक्यात वाघाची दहशत कायम आणखी १बैलाचा बडी

628

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

एटापल्ली: तालुक्या पासून चार किलोमीटर च्या जंगलात वाघाने घेतला बैलाचा जीव कक्ष क्रमांक ३७६एकरा( बु) जंगलात काल रात्री वाघाने एका बैलाला मारले. ही खबर वनरक्षक कु. कुंवर यांना माहिती प्राप्त होताच घटनास्थळी हजर झाले. व वरीष्टांना ह्याची खबर दिली तेंव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी कु. खोब्रागडे वनपाल गेडाम व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व प्राथमिक पंचनामा सादर केला. बैल सतीश बोडा वेलादि यांच्या मालकीचा असुन बैलाचा शवच्छेदन करण्यात आला असुन आज कॅमेरा जी,पि,स ट्रॅक लावण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कु निलीमा खोब्रागडे यांनी सांगितले.