वनविभागाच्या तपासणी नाक्यावर खाजगी कंपनीच्या ताबा: एकच कर्मचाऱ्याची २४ तास सेवा देत असल्याने कर्मचाऱ्यांना त्रास

404

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

*तपासणी नाक्यावर सरकारी दस्तावेज,खाजगी कंपनी चे मजूर करतात सह्या*

एटापल्ली येथील वनविभागाच्या तपासणी नाका असून सदर तपासणी नाक्यावर मागील अनेक दिवसांपासून वनपाल व वनरक्षकाची २४ तास सेवा देण्याची आदेश असल्यामुळे लगातार २४ तास सेवा देने शक्य नसल्याने शासकीय शिक्का व नोंदवही चक्क खाजगी कंपनीचे मजूर सुरक्षा रक्षक यांच्या स्वाधीन करून कार्यरत असलेले कर्मचारी आपल्या कक्षात झोपुन जात असल्याचे मागील अनेक दिवसांपासून सदर प्रकार सुरू असून सदर वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणीच खाजगी कंपनी कडे सोपवल्यामुळे सुरजागड लोह खदानीवरून चालणाऱ्या वाहना सोबतच इतर वाहनेही बिना तपासणी करता पास होत असल्याने मागील अनेक दिवसांपासून एटापल्ली व पेरमिली वन परिक्षेत्रात अवैधरित्या रेती व सागवान व इतर साहित्याची चोरी होत असल्याची ओरड सुजाण नागरिकांनी केली असल्याने दिनांक १९ आगस्ट ते २१ आगस्ट या तीन दिवस सदर प्रतिनिधी वन विभागाच्या तपासणी नाक्यावर पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला असून या प्रकरणा बद्दल *उपवनसंरक्षक शैलेश मीना यांच्याशी संपर्क केले असता २४ तास सेवा देण्याचे आदेश चुकीचे असून शासकीय दस्तावेज खाजगी कंपनी च्या कर्मचाऱ्यांना कोणी सोपविले त्याची चौकशी करून कारवाही करू सदर प्रकारची वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कडे चौकशी करावे असेही प्रस्तुत प्रतिनिधी सोबत बोलतांना उपवनसंरक्षक भामरागड शैलेश मीना यांनी सांगितले*