मेरी माटी – मेरा देश , विभाजन विभाषिका व हर घर तिरंगा उपक्रम गावा गावा मध्ये राबवा! #jantechaawaaz#news#portal#

48
प्रतिनिधी//

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे आव्हान.

चामोर्शी प्रथम आगमना प्रित्यर्थ आमदार परिवांकडून नवनियुक्त जिल्हाध्यक्षचा सत्कार!











भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघे यांनी बुधवारी 9 ऑगस्ट 2023 ला चामोर्शी तालुका बैठक आयोजित केले. आमदार श्री देवरावजी होळी व भाजपा पदाधिकारी, शक्ती प्रमुख,बूथ प्रमुख व कार्यकर्त्यान सोबत विविध विषयावर चर्चा केली.











त्याप्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.देवरावजी होळी,जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खट्टी, माजी प.स.सभापती आनंदजी भांडेकर, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी चे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, ओबीसी मोर्चा चे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, आशिष पिपरे, तालुका महामंत्री भोजराज भगत, ओबीसी तालुका महामंत्री डोमदेव रामसागर, प्रतिक राठी तालुका अध्यक्ष भायुमो,वासुदेव चीचघरे तालुका महामंत्री भयूमो, संजय खेडेकर तालुका अध्यक्ष ओबीसी मोर्चा,उमेश कुकडे तालुका सचिव, विलास चरडूके तालुका सचिव, नरेश अलसावार भायूमो जिल्हा सचिव, शेषराव कोहळे,संजय चलाख,असीम मुखर्जी,उमा गंधमवार, मनीषा बोधनवार, माधवी पे शेट्टीवार व शक्तीप्रमुख बूथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.









यानंतर जिल्हाध्यक्ष यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलले की, *मेरी माटी मेरा देश* देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशात मेरी माटी, मेरा देश मोहीम राबविण्यात येत आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोक सहभागातून विविध कार्यक्रमा आयोजित केले जाणार आहेत. ग्रामपंचायत मध्ये शिलाफलक बसवले जाणार आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा शूरवीरांचा सन्मान करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.वीरहृदयांची गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील










स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन करणारे










शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या भागातील ज्या शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावांबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल. ही मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक शहरी संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचा समावेश असेल. दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० कलशांमध्ये माती घेऊन अमृत कलश यात्रा काढण्यात येणार असूनही अमृत वाटिका एक भारत श्रेष्ठ भारत या वचनबद्धतेचे प्रतिक असेल. हा उपक्रम प्रत्येक गावा मध्ये राबवा असे आव्हान केले.









विभाजन विभाषिका स्मुर्ती दिन* या दिवशी आपण मुख मोर्चा  काढून साजरा करायचं आहे.आता दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी, 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी दिन म्हणून स्मरणात ठेवला जाईल. देशाची फाळणी आमच्यासाठी कशी आपत्ती ठरली हे लक्षात ठेवण्यासाठी हा विशेष दिवस 14 ऑगस्टला साजरा केला जाईल.” दोन वर्षापूर्वी म्हणजेच 14 ऑगस्ट 2021- 2022 आणि 14 ऑगस्ट 2023 रोजी देश फाळणीच्या वेदनांची आठवण करून हा दिवस साजरा करायचा आहे.




















आपला तीसरा विभिषिका स्मरण दिन साजरा करणार आहोत, हा देशातील एक राष्ट्रीय स्मृती दिवस आहे जो भारताच्या फाळणीच्या वेळी लोकांचे बळी आणि दुःख लक्षात ठेवतो. हा दिवस अनेक भारतीयांचे दुःख, अनेक कुटुंबे विस्थापित आणि फाळणीत प्राण गमावलेल्या अनेकांचे स्मरण करतो. उल्लेखनीय म्हणजे, फाळणीमुळे दहा लाख ते दोन दशलक्ष लोक विस्थापित झाले आणि लाखो लोक मारले गेले.













फाळणीच्या हिंसाचारामुळे आणि जातीय द्वेषामुळे लाखो लोक विस्थापित झाले आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्या लोकांच्या त्याग आणि संघर्षाच्या स्मृतीप्रित्यर्थ १४ ऑगस्ट हा फाळणीविभिषिका स्मृतिदिन म्हणून स्मरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणून हा दिवस मुख मोर्चा काढून साजरा करू या अस आव्हान केले.












हर घर तिरंगा

गेल्या वर्षी सर्वांच्या सहभागामुळे हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी झाला होता. या वर्षी देखील, १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हा उपक्रम साजरा केला जाणार आहे. तरी हे सर्व उपक्रम गावा गावा मध्ये राबवा व त्याची सेल्फी घेऊन सरल ॲप वर अपलोड करा व सर्व शक्ती प्रमुख बूथ प्रमुखाने आपल्या जोमा ने काम करावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले.













तसेच जिल्हा बंगाली आघाडी, किसान मोर्चा, युवा मोर्चा,ओबीसी मोर्चा च्या वतीने जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे यांचा सत्कार करण्यात आला.