मानधन तत्वावरील अधिक्षक व अधिक्षिका पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करत योग्य पात्रता धारकाची नियुक्ती करण्यात यावी #jantechaawaaz#news#portal#

47
प्रतिनिधी//

*_अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा यांची मागणी_










भामरागड:- आज दिनांक २३/०८/२०२३ रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या  वतीने मानधन तत्वावरील अधिक्षक व अधिक्षिका पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करत योग्य  पात्रता धारकाची नियुक्ती करण्यात यावी प्रकल्प अधिकारी भामरागड यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी करण्यात आली.

 दिनांक२३/०२/२०२२ रोजी एकलव्य मॉडेल रेसिडेंसिअल स्कुल ताडगाव / भामरागड येथे रुजु केलेल्या महिला/ पुरुष अधिक्षक व  अधिक्षीका यांची पदभरती नियमबाह्य पद्धतीने कागदपत्राची पूर्तता न करता व पात्रता नसताना त्यांना पदावर रुजु करण्यात आलेले आहे. आणि सदर पदभरतीची जाहिरात सुध्दा देण्यात आली नाही. जाहिरात न देता गोपनीय पद्धतीने व गैरव्यवहार करून पदभरती करण्यात आली आहे. सदर केलेल्या पदभरतीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी व सदर पदाची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करून योग्य पात्रता धारकाची  नियुक्ती करण्यात यावी व चौकशी अंती केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संघटनेकडे दहा दिवसात देण्यात यावा अशी मागणी  अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेराच्या वतीने प्रकल्प अधिकारी भामरागड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास युवा परिषद तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांच्यासह इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.