हळदी- कुंकू कार्यक्रमात एकत्र आले शेकडो महिला माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचा उपक्रम

51

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचा उपक्रम

मुलचेरा:माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली मुलचेरा तालुका मुख्यालयात घेण्यात आलेल्या हळदी- कुंकूच्या कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावातील शेकडो महिला एकत्रित आले.

भारतीय संस्कृतीत हळदी कुंकुला विशेष महत्व आहे.त्या अनुषंगाने अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध तालुक्यात भाग्यश्री ताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केले जात आहे.यानिमित्ताने सर्व महिला एकत्र येत एकमेकांविषयी आदर आणि प्रेमभाव व्यक्त करत मनोरंजनात्मक खेळ खेळत महिलांची ओटी भरून वाण वाटत आहेत.

बुधवार ३१ जानेवारी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात पैठणीचा जिंकू मान,हळदी कुंकुवाचे लुटू वाण.महिला बघिणींचा सन्मान आनंदाला येईल उधाण. या टॅगलाईन खाली लकी ड्रॉ काढून विजेत्या महिलेला सोन्याची नथ व एक पैठणी बक्षीस देण्यात आले.तर काही महिलांना लकी ड्रॉ काढून चांदीचे नाणे आणि पैठण सारी वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात विधवा स्त्रियांना हळदी कुंकुचा मान देऊन सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमात जवळपास ८०० महिलांनी सहभाग घेतला असून महिलांची अफाट अशी गर्दी बघायला मिळाली.भाग्यश्री ताई आत्राम यांनी सर्व महिलांना हळदी कुंकू आणि वाण वाटले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.